Friday, October 22, 2021
No menu items!
Homeक्राईमधूमस्टाईलने मोबाईल चोरणार्‍या दोघांना ठोकल्या बेड्या

धूमस्टाईलने मोबाईल चोरणार्‍या दोघांना ठोकल्या बेड्या


बीड (रिपोर्टर):- मोबाईलवर बोलत असताना स्कुटीवर येऊन मोबाईल हिसकावून पोबारा करणार्‍या एका अल्पवयीन मुलासह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून मोबाईल जप्त केला आहे.
अक्षय भांडेकर (रा. इंडिया बँक कॉलनी, बीड) हा त्याच्या घरासमोर २७ एप्रिल रोजी मोबाईलवर बोलत असताना पाठीमागून स्कुटीवर भरधाव वेगात आलेल्या दोघांनी त्याचा मोबाईल हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणी भांडेकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस या घटनेचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला मोबाईल चोरट्यांचा सुगावा लागला. काल दुपारी चार वाजता मोंढा रोड येथून एक १७वर्षीय अल्पवयीन मुलासह रोहीदास सुरेंद्र चोधा (रा. पेठ बीड) याला पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली. चोरी करण्यासाठी त्याने वडिलांची स्कुटी वापरल्याचे सांगितले. सदरील कारवाई स्था.गु.शा.चे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जोंधळे यांनी केली.

Most Popular

error: Content is protected !!