Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडशिवसंग्राम पदाधिकार्‍यांची ‘पदवीधर’च्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक

शिवसंग्राम पदाधिकार्‍यांची ‘पदवीधर’च्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक

बीड (रिपोर्टर)- शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांच्या उपस्थितीत दिनांक १७ नोव्हेंबर २०२० रोजी शिवसंग्रामच्या औरंगाबाद विभागाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक शिवसंग्रामभवन, बीड येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत पदवीधर निवडणुकीबाबत शिवसंग्रामच्या भूमिकेविषयी चर्चा करण्यात येणार असून संपूर्ण विभागातील प्रमुख पदाधिकार्‍यांनी या बैठकीला उपस्थित राहायचे आहे.
पदवीधर निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकार्‍यांची हि बैठक दि १७ नोव्हेंबर २०२० रोजी शिवसंग्राम भवन, नगर नाका, बीड येथे दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सध्या राज्यभरात विधानपरिषदेच्या पदवीधर जागांच्या विभागनिहाय निवडणूका जाहीर झाल्या असून औरंगाबाद विभागाच्या निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा व निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Most Popular

error: Content is protected !!