पोलीस स्टेशनला जमाव, दंगल नियंत्रण पथकाला पाचारण,
जयसिंह सोंळके देखील तळ ठोकून, डिवयएसपी बच्चू पोलीस स्टेशनला दाखल
वडवणी (रिपोर्टर):- वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील मेडिकल मालकाला नि;शुल्क कारणावरुन रात्री मारहाण झाली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करावी तसेच शहरासह तालुक्यातील अवैदय धंदे बंद करण्यात यावेत.यामागणीसाठी आज सकाळपासूनच पोलीस स्टेशनला गर्दी जमली होती यांचे पडसाद दुपारी साडेबारा नंतर बाजार पेठेवर झाले असून मुख्य बाजार पेठ देखील बंद झाली आहे.शहरात तणाव पूर्वक शांतता दिसून आली आहे.तर दंगल नियंत्रण पथकासह माजलगांवचे डिवायएसपी धिरजकुमार बच्चु हे देखील पोलीस स्टेशनला दाखल झाले आहेत.या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.परंतु कोणते गुन्हे दाखल झाले आहेत.आरोपी कोण आहेत.हे उशीरा पर्यत समजू शकलेले नाही.दीड वाजण्याच्या सुमारास उपस्थित जमावा समावेश डिवायएसपी बच्चू यांनी चर्चा केली असून यामध्ये आरोपीला पाठीशी घालणार नाहीत तसेच अवैद्य धंदा विरोधात कडक मोहिम राबवली जाईल या अश्वासना नंतर जमाव पागवण्यात आला आहे.तर वडवणी पोलीस स्टेशनमध्ये जयसिंह सोंळके यांच्यासह स्थानिक नेते मंडळी देखील उपस्थित आहेत.