Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeक्राईमव्यापार्‍याला लुटणारे दोघे आरोपी जेरबंद नगदी रोकड पोलिसांनी घेतली ताब्यात

व्यापार्‍याला लुटणारे दोघे आरोपी जेरबंद नगदी रोकड पोलिसांनी घेतली ताब्यात

परळी (रिपोर्टर):- अंबाजोगाई आणि परळीत वसुली करून परत जाणार्‍या औरंगाबादच्या व्यापार्‍याची परळी शहरात २५ लाखाची बॅग काल दुपारी दोन चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या मुसक्या परळी पोलिसांनी आवळल्या असून त्यांना औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर रिकव्हरी करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनी दिली.
फिर्यादीने शहर पोलीस स्टेशनला येवून फिर्याद दिली की, औरंगाबाद येथील संजय प्लास्टिक होलसेल दुकान चालवत असून मी संपूर्ण मराठवाडा येथे होलसेल माल देत असून मी माझी वसूली करून मोंढा भागात उभी केली असता माझ्या क्रेटा गाडीतील बँग मधील रोख रक्कम २५ लाख रूपये घेवून पळून गेलेले चोरटे यांच्या विरोधात शहर पोलीस स्टेशन ला गुन्हा नंबर ३११/२० कलम ३७९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला .गुन्हा नोंद झाल्यापासून अवघ्या २४ तासात आरोपी अटक करण्यात पराळी शहर डी.बी ला यश आले असून परळी शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे पोलीस जमादार भास्कर केंद्रे,सुंदर केंद्रे , शंकर बुड्डे,गोविंद भताने, हानूमान मुंडे यांनी तब्बल ८०० किलोमीटर लपाछपी च्या डावाप्रमाणे पाठलाग करुन वैजापूर येथून दोन आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेतले असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अशोक खरात साहेब हे करत आहेत .

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!