Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनासडकफिर्‍यांची अँटीजेन तपासणी

सडकफिर्‍यांची अँटीजेन तपासणी


दुपारपर्यंत चाळीस जणांचे केले टेस्ट; तीन जण निघाले पॉझिटिव्ह

केज (रिपोर्टर):- महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने १५ मेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आले. बीड जिल्ह्यामध्ये मात्र सडकफिर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसू लागल्याने जिल्हा प्रशासनाने या सडकफिर्‍यांची रसत्यावरच चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. दुपारी बारा वाजेपर्यंत ४० जणांचे अँटजेन टेस्ट करण्यात आले. यात तिघा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यामध्ये कोरोनाचे हजारो रुग्ण आढळून येत असल्याने १५ मेपर्यंत राज्य सरकारने लॉकडाऊन लावलेले आहे. असे असतानाही सडकफिरे रस्त्याने फिरताना दिसून येत आहेत. बीड जिल्हा प्रशासनाने सडकफिर्‍यांची अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. केज येथील आरोग्य प्रशासनाने दुपारी बारा वाजेपर्यंत ४० जणांची अँटीजेन टेस्ट घेतली. यात तिघा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अँटीजेन टेस्ट करण्यासाठी तहसीलदार दुलाजी मेंेंडके, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, आरोग्य विभागाचे डॉ. चाटे, न.प.चे सय्यद अन्वर, असद खतिब, दादा हजारे यांच्यासह आदी कर्मचारी रस्त्यावर ठाण मांडून आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!