Friday, May 7, 2021
No menu items!
HomeUncategorizedदिदींच्या ममतेवर मोदी-शहा घायाळ

दिदींच्या ममतेवर मोदी-शहा घायाळ

बीड (रिपोर्टर):- पश्‍चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांना हरवण्यासाठी जंग जंग पछाडणार्‍या भारतीय जनता पार्टीला अखेर तेथील जनतेने धोबीपछाड देत अक्षरश: रडावयास भाग पाडले. २९२ जागांसाठी झालेल्या मतदानामध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमुल कॉंग्रेसला २०७ जागांवर जबरदस्त आघाडी मिळाली असून भाजपाला याठिकाणी ८१ जागांवर आघाडी आहे. कॉंग्रेस आणि अन्य पक्षांना बोटावर मोजण्याइतकेही जागा मिळतात की नाही अशी परिस्थिती सध्या आहे. देश कोरोनाशी झगडत असताना भाजप मात्र सत्तेसाठी मारामार करत होता.
अखंड भारत देश कोरोना सोबत दोन हात करत असताना देशातलं केंद्र सरकार पाच राज्यात निवडणुका घेत होतं. पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना हरवण्यासाठी भाजपाने अवघ्या देशाची ताकद लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह वेगवेगळ्या राज्यातले अनेक भाजप नेते, पदाधिकारी पश्‍चिम बंालमध्ये डेरेदाखल होते. अन्य राज्यांमध्ये आयात केलेल्या उमेदवारांवर स्वार होणारं भाजप पश्‍चिम बंगालमध्येही तसच स्वार झालं होतं. २७ मार्च ते २९ एप्रिल या कालावधीत ८ टप्प्यांमध्ये या ठिकाणी मतदान झाले असून आज मतमोजणीच्या दिवशी सुरुवातीपासूनच ममता बॅनर्जींचा तृणमूल कॉंग्रेस पक्ष भाजपावर प्रचंड आघाडी घेऊन घोडदौड करत आहे. कुठल्याही परिस्थितीत पश्‍चिम बंगालमध्ये सरकार येणारच. दोनशेपेक्षा जास्त जागा आमच्या निवडून येणार, असा दावा करणार्‍या भाजप नेत्यांना अक्षरश: पश्‍चिम बंगालच्या जनतेने रडवलं, दुपारी दीड वाजेपर्यंत सर्व जागांचे निकाल हाती आले होते. या निकालात ममता बॅनर्जींनी दोनशेचा आकडा केव्हाच पार केला होता. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसला २०७ जागा तर भाजपाला ८१ जागांवर आघाडी होती. या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी १४७ आमदारांची आवश्यकता असून ममता बॅनर्जी पुन्हा या ठिकाणी तिसर्‍यांचा सत्ता स्थापन करणार आहेत.

पॉंडिचेरीत एनडीएला आघाडी

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पॉंडिचेरी (सध्याचे पुद्दुचेरी) मध्ये ३० जागांसाठी निवडणुका झाल्या असता त्यातील १२ जागांचे निकाल हाती आले असता यात एनडीएला ८, यूपीए ३ तर इतर एक जागेवर आघाडीवर आहेत.

तामिळनाडुमध्ये
डीएमकेची घोडदौड

२३४ जागा असलेल्या तामिळनाडुमध्ये डीएमके १४६ जागांवर आघाडीवर असून एआयएडीएमके ८७ जागा घेऊन घोडदौड करत आहेत. इतर केवळ एका जागेवर आघाडीवर आहेत.

केरळच्या जनतेने भाजपला धुडकावलं

प्रादेशिक पक्षांना समुळ नष्ट करण्याइरादे सातत्याने निवडणुकीत उतरणार्‍या भाजपाला केरळच्या जनतेने चांगलाच धडा दिल्याचे दिसून येते. केरळमध्ये एलडीएफ सर्वाधिक ९३ जागांवर तर यूडीएफ ४५ जागा घेऊन दुसर्‍या क्रमांकावर असून भाजपाला या ठिकाणी केवळ २ जागा मिळवता आल्या.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

आसाममध्ये भाजप आघाडीवर
आसाममध्ये १२६ जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आघाडी घेऊन असून एनडीए ८१ जागांवर तर यूपीएला ४५ जागांवर आघाडी घेऊन आहेत. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनवाल यांनी भाजपच आसाममध्ये सरकार स्थापन करणार, असा दावा केला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

पंढरपूर विधानसभेत भाजपा आघाडीवर

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात आली असून सुरवातीपासून आघाडीवर असलेले राष्ट्रवादीचे भगीरथ भालके शेवटच्या टप्प्यात पिछाडीवर गेले असून भाजपाचे समाधान अवताडे आघाडी घेऊन आहेत शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा भाजप – समाधान आवताडे : ८९०३७,
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : ८३०२७

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!