Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज 1 हजार 345 कोरोना पॉझिटिव्ह आढळले बीड तालुक्यातील सर्वाधिक 338

आज 1 हजार 345 कोरोना पॉझिटिव्ह आढळले बीड तालुक्यातील सर्वाधिक 338

बीड (रिपोर्टर):- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 15 मे पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात मात्र हजाराच्या खाली आकडा कमी होतांना दिसून येत नाही. आज आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 345 रूग्ण आढळून आलेले आहेत. सर्वाधिक बीड शहरासह तालुक्यात 338 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाची दुसरी लाट आल्याने रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. राज्यात दररोज हजारो रूग्ण नवीन सापडतात. बीड जिल्ह्यामध्येही दररोज हजारापेक्षा जास्त रूग्ण आढळून येत आहेत. आज आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 345 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. 4 हजार 79 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 2 हजार 734 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अंबाजोगाई तालुक्यात 192, आष्टी 60, बीड 338, धारूर 32, केज 148, गेवराई 183, माजलगाव 65, परळी 106, पाटोदा 48, शिरूर कासार 104, वडवणी 39 रूग्ण आढळून आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!