Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडअवकाळी पावसाने आंब्याचा सडा खरबूज, टरबूजसह भाजीपाल्याचेही नुकसान

अवकाळी पावसाने आंब्याचा सडा खरबूज, टरबूजसह भाजीपाल्याचेही नुकसान


नेकनूर/बीड (रिपोर्टर):- तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये कुठे ना कुठे वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाने फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. काल नेकनूर, केज, चौसाळा यासह अन्य परिसरात पाऊस झाल्याने या पावसात अक्षरश: काही शेतकर्‍यांचे आंब्याचे मोठे नुकसान झाले. सडा टाकल्याचा आंब्याच्या कैर्‍या खाली पडल्या. टरबूज, खरबूज या फळ पिकांचेही मोठे नुकसान झाले.
मराठवाड्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. काल पुन्हा केज, नेकूर, चौसाळा, मांजरसुंबा यासह अन्य परिसरामध्ये वादळी वार्‍यासह पाऊस पडला. यात नेकनूर येथील शेख गुलाम खाजा मैनुद्दीन यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाच्या कैर्‍या सडा टाकल्यागत पडल्या. त्यात त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यासह अन्य शेतकर्‍यांचेही फळपिकांचे नुकसान झाले. बहुतांश शेतकर्‍यांनी खरबूज, टरबूज, काकडी व भाजीपाल्याची लागवड केली आहे. या शेतकर्‍यांचे देखील कालच्या पावसामुळे नुकसान झाले असून सदरील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होऊ लागली आहे.

Most Popular

error: Content is protected !!