Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनालॉकडाऊनमध्ये बँकांचा कर्जदारांकडे तगादा जिल्हाधिकार्‍यांनी बँकांचा सवलत देण्याचे निर्देश द्यावेत

लॉकडाऊनमध्ये बँकांचा कर्जदारांकडे तगादा जिल्हाधिकार्‍यांनी बँकांचा सवलत देण्याचे निर्देश द्यावेत


बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यात १५ मेपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले. यामुळे सर्वसामान्य व व्यापारी आर्थिक कोंडी सापडला. अनेकांकडे बँकांचे कर्ज आहे. लॉकडाऊन असले तरी बँका मात्र कर्जवसुलीबाबत मागे-पुढे न पाहता वसुलीचा रेटा सुरुच ठेवत आहेत. बँकांनी काही प्रमाणात सवलत द्यावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित बँकांना कर्जवसुली थांबवण्याबाबतचे निर्देश द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
गेल्या मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचे संकट आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सध्या राज्य सरकारने १५ मेपर्यंत कडक निर्बंध लावले त्यामुळे जवळपास पुर्ण व्यवसाय बंद आहेत. व्यवसाय बंद असल्याने सर्वसामान्यांसह छोटे-मोठे व्यापारी आर्थिक संकटात सापडले. अनेक व्यवसायिकांनी बँकांकडून कर्ज घेतलेले आहे. लॉकडाऊनमुळे बँकांचे हप्ते थकले, बँका मात्र कसल्याही प्रकारची सुट देण्यास तयार नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारने कर्ज प्रकरणाबाबत बँकांना कसलेही निर्देश दिले नसल्याने बँकांची अगदी सक्तीने वसुली सुरू आहे. बीड शहरासह जिल्हाभराती अनेक व्यापारी बँकेच्या हप्त्यामुळे त्रस्त असून जिल्हाधिकारी यांनी याबाबत दखल घेत बँकांनी काही महिन्याची सुट द्यावी, परिस्थिती सुधारल्यानंतर बँकांनी कर्जवसुली सुरू करावी, तसे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी यांनी द्यावेत, अशी मागणी सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!