Friday, May 7, 2021
No menu items!
Homeबीड31 मे ला जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार

31 मे ला जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार

माहिती गोळा करण्याचे काम शिक्षण विभागाकडून सुरू
बीड (रिपोर्टर):- गेल्या सरकारच्या काळामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या राज्यस्तरावरून ऑनलाईनद्वारे होत होत्या. मात्र या नियमाला बगल देत विद्यमान सरकारने एक शासन आदेश काढून जिल्हा अंतर्गत बदल्या करण्याचे अधिकार पुन्हा एकदा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिल्याने बीड जिल्हा परिषद अंतर्गतही जिल्हा  अंतर्गत बदल्या 31 मे च्या पुर्वी किंवा 31 मे या दिवशी करण्यात येणार आहेत. अशी माहिती शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

31 मे पुर्वी बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा अंतर्गत बदलीसाठी प्रत्येक गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून शिक्षकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये पती-पत्नी एकत्रीकरणा अंतर्गत करण्यात येणार्‍या बदल्या सोबतच एका शाळेवर 3 पेक्षा जास्त आणि पाच वर्षे अशी सेवा झालेली आहे अशा शिक्षकांचीही माहिती गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून गोळा करण्यात येत आहे. जे शिक्षण बदलीस पात्र आहेत अशा सर्व शिक्षकांची माहिती सेटल करून ही माहिती शिक्षण विभागाच्या (जि.प.) पोर्टलवर प्रसिद्ध केल्यावर संबंधित बदलीपात्र शिक्षकाला आपल्याला ज्या ठिकाणी बदली हवी आहे अशा 20 ठिकाणची नावे आपल्या बदलीच्या अर्जात भरून द्यावयाची आहेत. त्यामुळे याही वर्षी कोरोना रोगाची पार्श्‍वभूमी असली तरी शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पुर्वी जिल्हा अंतर्गत बदल्या होणार आहे. त्यामुळे बदलीसाठी उत्सुक असलेले शिक्षकात आनंदाचे वातावरण आहे. त्यासोबतच राज्यस्तरावरूनही ऑनलाईन बदल्याद्वारे या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात अशा बदल्या करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी 42 शिक्षक आपले इतर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यामध्ये बदली करून आले होते. याही शिक्षकांना जिल्हा परिषदेने रूजू करून घेतले होते. मात्र त्यांना शाळा दिली नव्हती अशा 42 शिक्षकांना पदभार देण्याचे काम शिक्षण विभागाकडून सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

error: Content is protected !!