Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeकोरोनातीन दिवसांचा कडक लॉकडाऊन दुध विक्री सकाळी सात ते अकरापर्यंत करता येणार

तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन दुध विक्री सकाळी सात ते अकरापर्यंत करता येणार


गॅस वितरण दिवसभर सुरू राहील
बीड (रिपोर्टर):- बीडजिल्ह्यामध्ये कोरोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दि.5 मे ते 7 मे असा 3 दिवसामध्ये वैद्यकीय सेवा सोडता. सर्व सेवा या बंद करण्याचे आदेश रात्री जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काढले आहेत. या तीन दिवसात किराणा दुकान, भाजीपाला दुकाने इतर सर्व व्यापारी तीन दिवस कडेकोट बंद राहणार आहे. 7 ते 11 या कालावधीतही हे दुकाने उघडणार नाहीत. यामध्ये शासकीय कार्यालय 15 टक्के उपस्थितीने सुरू राहतील. त्यासोबत खालील सेवा या तीन दिवस सुरू राहणार असून इतर सर्व सेवा तीन दिवस बंद राहणार आहे. यामुळे बीड जिल्ह्यात तीन दिवसाचा कडेकोट लॉकडाऊन जिल्हाधिकार्‍यांनी लागू केला आहे.
या तीन दिवसात सर्व औषधालये, दवाखाने, निदान क्लिनीक, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्मास्युटिकल्स, फार्मास्युटिकल कंपन्या इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतुक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकीय उपकरणे, कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपा सेवा इ.चालू राहणार आहे. दरम्यान दूध विक्री प्रत्येक दिवशी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत करता येणार आहे. गॅस वितरण दिवसभर सुरू राहील. बँकेचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अंतर्गत कामकाजासाठी व शासकीय व्यवहारासाठी सुरू राहील. शनिवार, रविवार रोजी दि. 8.5.2021 ते 9.5.2021 जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणार्‍या आस्थापना (किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, चिकन मटन, बेकरी व कृषीशी संबंधित दुकाने केवळ सात ते अकरा या वेळेत चालू राहतील.) तसेच शनिवार व रविवार रोज दि. 8.5.2021 ते 9.5.2021 केवळ फिरून हातगाड्यावर फळांची विक्री सायंकाळी 5 ते रात्री 7 या वेळेत करता येईल. सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!