Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाकेंद्रेकर आले, डॉक्टरांसह आरोग्य कर्मचार्‍यांचे मनोबल वाढवले; म्हणाले, लोकांचे जीव तुमच्या हातात

केंद्रेकर आले, डॉक्टरांसह आरोग्य कर्मचार्‍यांचे मनोबल वाढवले; म्हणाले, लोकांचे जीव तुमच्या हातात

सुनिल केंद्रेकरांची लोखंडी सावरगावच्या कोविड सेंटरला भेट, चांगले काम करणार्‍याचे कौतुक तर कामचुकारांना खडेबोल
बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यातील कोरोना समुहसंसर्ग रोखण्यासाठी दस्तुरखुद्द राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कंबर कसत रात्रीचा दिवस करून वेगवेगळ्या कोविड सेंटर्सला भेट देत तात्काळ उपाययोजनांवर भर दिल्यानंतर जिल्ह्याचे प्रशासनही आता हरकतमध्ये आले असून जिल्हाधिकारी रविंद्र जगतापांनी आज अंबाजोगाई, परळी येथील कोविड सेंटर्सला भेटी देऊन पाहणी केली. त्यापाठोपाठ विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर हेही जिल्ह्यात डेरेदाखल झाले असून त्यांनी लोखंडी सावरगाव येथी कोविड सेंटरला भेट दिली. या वेळी त्यांनी उपस्थित रुग्णांसोबत चर्चा करत अडीअडचणी समजून घेऊन डॉक्टरांना त्याबाबत सूचना दिल्या.

aa6


  बीड जिल्ह्यात कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत आहे. इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड याबाबत सातत्याने ओरड झाली. परंतु पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे जिल्ह्याकडे असलेले लक्ष पाहता त्या अडीअडचणी तात्काळ सोडविण्यातही आल्या. पालकमंत्र्यांनी रात्रीचा दिवस करून कोविड सेंटरमध्ये भेटी देत तात्काळ उपाययोजना सुरू ठेवल्या. दस्तुरखुद्दी पालकमंत्री कोविड सेंटरला भेटी देत असल्याचे पाहून आज जिल्हाधिकारीही हरकतमध्ये आले. त्यांनी धारूर, तेलगाव, लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटर्सला भेटी दिल्या तर आयुक्त सुनिल केंद्रेकर हे जिल्ह्यात डेरेदाखल झाले. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमध्ये पोहचले. अगोदर डॉक्टर, कर्मचार्‍यांसोबत केंद्रेकरांनी चर्चा केली.

aa4

सध्याचा काळ गंभीर आहे, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला लोकांच्या आरोग्याबरोबर त्यांचे मानसिक आरोग्य राखायचे आहे. तुमचे काम हे जीव वाचवणारे आहे, त्यामुळे इमाने इतबारे काम करा, काही अडीअडचणी असतील तर जिल्हाधिकारी अथवा आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगा, माझ्यापर्यंतही अडचणी सांगितल्या तरी काही हरकत नाही, असे म्हणत केंद्रेकरांनी उपस्थित डॉक्टर-कर्मचार्‍यांचे मनोबल वाढवले. काहींना सुनावलेही. नंतर त्यांनी कोविड सेंटरमध्ये रुग्णांसोबत चर्चा केली. नातेवाईकांसोबत चर्चा केली. आज दिवसभर बीड जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा आयुक्त सुनिल केंद्रेकर घेणार आहेत.

Most Popular

error: Content is protected !!