Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाबीड तालुक्यात सर्वाधिक तर जिल्हात १४९९ कोरोना बाधित ,१०११ रुग्णानी केली कोरोनावर...

बीड तालुक्यात सर्वाधिक तर जिल्हात १४९९ कोरोना बाधित ,१०११ रुग्णानी केली कोरोनावर मात

बीड (रिपोर्टर) आज आलेल्या अहवालामध्ये जिल्हाभरात १४९९पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. एकुण ४८४२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात ३३४३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.बीड तालुक्यात सर्वाधिक ३८१ कोरोना बाधित आढळून आले दुसरीकडे आज जिल्हातील कोईड सेंटर मधून १ हजार ११ रुग्नानी कोरोनावर मात केली आहे हि एक समाधानाची बाब आहे


बीड जिल्ह्यामध्ये दररोज हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले असले तरी कोरोनाची साखळी तुटत नसल्याचे दिसून येत आहे. आज आलेल्या अहवालात १४९९जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर ३३४३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. एकुण ४८४२ संशयितांचे स्वॅब तपासण्यात आले होते. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई २१२, आष्टी ५८, बीड ३८१, धारूर ६८, गेवराई ११९, केज १५१, माजलगाव ६८, परळी १२६, पाटोदा ५९, शिरूर २०६, वडवणीत ५१ तालुक्यात रूग्ण आढळून आले आहेत.दुसरीकडे बीड जिल्हातील कोईड सेंटर मधून आज १ हजार ११ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्नालयातून सुट्टी देण्यात आली

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!