Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या -ऍड. सुभाष राऊत

ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या -ऍड. सुभाष राऊत


जिल्हाधिकारी यांना दिले समता परिषदेने निवेदन
बीड (रिपोर्टर)- ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करावा तसेच ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. या वेळी ऍड. सुभाष राऊत यांच्यासह आदींची उपस्थिती होती. राज्यात ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी असे तीन उपगट व व्हिजेएनटीचे आणखी ४ उपगट असले तरी या सर्व जाती-जमाती ओबीसी म्हणूनच ओळखल्या जातात. तसेच पंचायत राज्यातील राजकीय आरक्षणासाठी त्या सर्वांना ओबीसी म्हणून मान्यता आहे. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करावा व ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी ऍड. राऊत यांनी केली. या वेळी गणेश जगताप, अर्जून दळे, संदीप बेदरे, निखील शिंदे, नितीन साखरे, दिलीप बेदरे, सावता काळे, मनोज भानोसे, गोरख साळुंके, विकास खेत्रे, नितीन राऊत, दत्ता प्रभाळे, नामदेव म्हेत्रे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!