Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाराज्य सरकार आणि प्रशासनात समन्वय नसल्यामुळे कोरोनाचे रुग्णसंख्या 50 टक्क्याने वाढले -प्रवीण...

राज्य सरकार आणि प्रशासनात समन्वय नसल्यामुळे कोरोनाचे रुग्णसंख्या 50 टक्क्याने वाढले -प्रवीण दरेकर

सरकारने झोपेचे सोंग घेण्याऐवजी श्‍वेतपत्रिका काढावी
बीड (रिपोर्टर):- सरकार आणि प्रशासन यांच्यात समन्वय नाही. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाने शिरकाव केलेला आहे. ज्या ठिकाणी ऑक्सिजन पाहिजे त्या ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाही. रेमडिसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटात सरकार काम करण्याऐवजी विरोधी आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात मश्गुल आहेत. त्यामुळे राज्य सरकारने कोविड-19 या विषयावर एक श्‍वेतपत्रिका काढावी, सरकार आणि प्रशासनात समन्वय नसल्यामुळे राज्यात कोरोनाचे 50 टक्के रुग्ण वाढलेले आहेत, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.


   दरेकर हे कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठाण यांच्या वतीने बीड शहराजवळील वासनवाडी फाटा या ठिकाणी जिजाऊ कोविड सेंटरच्या दोनशे खाटांच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. या ठिकाणी शिवसंग्रामचे आ.विनायक मेटे, नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज, जिल्हा शल्यचिकित्सक हॉ. सुर्यकांत गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, सीएस बी.बी. जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरेकर पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातील मंत्री घरातून बाहेर पडत नाहीत, सरकारला वाटतय कोरोना फक्त मुंबईतच आहेत. ज्या ठिकाणी आक्सिजनची गरज आहे त्या ठिकाणी ऑक्सिजन दिले जात नाही, कसेबसे ऑक्सिजनचे प्लान्ट सुरू केले जातात, पुन्हा ते बंद पडतात. बीड जिल्हा रुग्णालयात सुरू केलेला ऑक्सिजन प्लान्ससुद्धा बंद पडलेला आहे. सरकार सर्वच ठिकाणी भांबावून गेलेला आहे. विद्यमान सरकारच्या काळातील अनेक बडे राजकीय पदाधिकार्‍यांनी रेमडिसीवीर इंजेक्शन घरातून वाटले. सरकारचे अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकार्‍यांवर नियंत्रण नाही, ज्या ठिकाणी दोन हजार इंजेक्शनची गरज आहे त्या ठिकाणी शंभर इंजेक्शन दिले जातात आणि ज्या ठिकाणी शंभर इंजेक्शनची गरज आहे त्या ठिकाणी पाचशे इंजेक्शन दिले जातात. कशातच कशाचं मेळ नाही. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत सरकारला कोविड आजाराबाबत अभ्यास करून चांगले नियंत्रण करणे गरजेचे होते. मात्र सरकार आमच्यावर काम करता येत नसल्यामुळे टिका करत आहे. उलट केंद्र सरकारने ऑक्सिजन कमी प्रमाणात दिले, कोविड लसी कमी प्रमाणात दिले जातात. रेमडिसीवीर इंजेक्शनही कमी प्रमाणात मिळतात, अशी नुसती ओरड केंद्र सरकारच्या नावाने विद्यमान सरकार करत आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारने काय दिले आणि राज्य सरकारने काय केले याबाबत श्वेतपत्रिका काढावी, असेही दरेकर यांनी सांगितले. याच कार्यक्रमात या कोविड सेंटरचे व्हरच्युएल माध्यमातून देवेंद्र फडणवीसांनी उद्घाटन करताना राज्य सरकारवर खरपूच टीका करताना ज्या ठिकाणी सरकारचा फोकस पाहिजे त्या ठिकाणी सरकार फोकस करत नाही. सरकार कोविड काळामध्ये लोकांना तात्काळ ऑक्सिजन, बेड, रेमडिसीवीर इंजेक्शन, व्हेंटीलेटर उपलब्ध झाले पाहिजेत. आ. विनायक मेटे यांनी 200 बेडचे कोविड सेंटर सुरू केले हे अत्यंत चांगले काम केले, अशी कौतुकाची थाप फडणवीस यांनी मेटेंच्या कामावर मारली. या वेळी आ. मेटे यांनीही राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनावर टीका करत माणुसकीच्या नात्याने कोविडसेंटर सुरू केले आहे. भविष्यातही रुग्ण संख्या वाढल्यावर 500 बेडपर्यंतचे कोविड सेंटर अण्णासाहेब प्रतिष्ठाणच्या माध्यमातून सुरू करण्याचे प्रयत्न केले जातील, असे सांगितले. या वेळेस त्यांनी नगरपालिकेवरही टीका केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्यांनी कोविड सेंटरला इमारत दिली असे मॉ साहेब पतसंस्थेचे बबन शिंदे यांनी केले. 

Most Popular

error: Content is protected !!