Friday, October 22, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द,खा .संभाजीराजे,ना.दरेकर ,आ,मेटेंची प्रतिक्रिया

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द,खा .संभाजीराजे,ना.दरेकर ,आ,मेटेंची प्रतिक्रिया

ठाकरे सरकारला मोठा धक्का
नवी दिल्ली (वृत्तसेवा):- राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नाझीऱ, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने आज निकाल सुनावला आहे.
   1992 मध्ये इंद्रा सहाणी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने 50 टक्के आरक्षण मर्यादा घालून दिली होती. नऊ सदस्यीय खंडपीठानं हा निकाल दिला होता. त्यामुळे मराठा आरक्षण देण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आलेलं होतं. या याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाली झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. सकाळी 10.30 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली.  सुप्रीम कोर्टाने निकाल सुनावताना मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय आणि मागास आयोगाचा रिपोर्ट याच्यातून आम्हाला मराठा आरक्षण देणं गरजेचं आहे हे स्पष्ट होत नसल्याचं सांगितलं. तसंच इंद्रा सहानी खटल्याबाबत पुन्हा एकदा तपासणी करण्याची गरज वाटत नसल्याचा उल्लेख करत मराठा आरक्षण रद्द करत असल्याचा निर्णय दिला.

मराठा समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण मिळालं होतं मात्र त्यानंतर ज्या काही कायदेशीर बाबी आणि न्यायालीन लढाई लढायची होती ती लढाई योग्य पद्धतीने ठाकरे सरकार लढू शकले नाही. कोर्टामध्ये त्यांनी पाठपुरावा केला नाही. देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने भूमिका मांडली होती तशी भूमिका मांडली नाही, राजकारण केलं, सरकारच्या त्या दुर्लक्षपणाची किंमत आज या निकालातून मराठा समाजाला मोजावी लागत आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

अशोक चव्हाण राजीनामा द्या -आ. मेटे
न्यायालयाने दिलेला आजचा निकाल म्हणजे मराठा समाजासाठी काळा दिवस आहे. आरक्षणासाठी समाजाने रस्त्यावर येऊन संघर्ष केला, अनेकांनी बलिदान दिले, मात्र राज्यातील आघाडी सरकारने या आरक्षणाचा पाठपुरावा व्यवस्थित केला नाही. लाखो-करोडो लोकांचे आयुष्य या निकालामुळे उद्ध्वस्त झाले. हे उद्ध्वस्त आयुष्य मुख्यमंत्री ठाकरे आणि अशोक चव्हाण कसे पाहू शकतात. या प्रकरणात अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यायला हवा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजचे आज पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजासाठी काय सुविधा देणार हे स्पष्ट केले पाहिजे. मराठा आरक्षण घालवायला राज्यातले आघाडी सरकार आणि अशोक चव्हाण हेच जबाबदार असल्याचा आरोप आ. विनायक मेटे यांनी केला. कोरोनाचा काळ असताना सोशल डिस्टन्स पाळून राज्यातील मराठ्यांनी आता सरकारला धारेवर धरायला हवे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!