Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाबीड मध्ये विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा

बीड मध्ये विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा

बीड -ऑनलाईन रिपोर्टर

कोरोनाच्या महामारीत जमावबंदी आदेशाचे उलनघन करत बीड शहरात आंदोलन करणारे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या सह भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व अन्य 10पेक्षा अधिक भाजपा कार्यकर्त्यावर शिवाजी नगर पोलिसात जमावबंदी आणि आपत्ती वेवस्थापन कायद्या नुसार गुन्हा दाखल झाला आहे

आ विनायक मेटे यांनी उभारलेल्या कोईड सेंटरचे उदघाटन करण्यासाठी बीड मध्ये ढेरेंदाखल असलेले राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज सकाळी बीड मधील भाजपा कार्यालया समोर पश्चिम बंगाल मध्ये भाजपा कार्यकर्त्यावर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेदार्थ तेथील सरकारचा निषेध केला या वेळी त्यांनी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमवून जिल्हात लागू असलेल्या जमाव बंदीचे उल्लन्घन केले म्हणून शिवाजी नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, राम कुलकर्णी, अजय सवाई, सचिन उबाळे, शरद बेडके, उल्लास बामणे, नरेश पवार, कल्याण पवार इतर 8 ते 10 भाजपा कार्यकर्त्यावर आपत्ती वेवस्थापन कायद्या सह जमावबंदी चे उल्लन्घन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!