Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeकोरोनाबीडमध्ये ७५ सडकफिर्‍यांच्या अँटीजेन टेस्ट; १० जण बाधीत

बीडमध्ये ७५ सडकफिर्‍यांच्या अँटीजेन टेस्ट; १० जण बाधीत


बीड (रिपोर्टर):- कोरोनाला आळा घालण्यासाठी बीड जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आले. मात्र तरी देखील नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यानंतर आरोग्य विभागाने मोकार फिरणार्‍यांच्या अँटीजेन टेस्ट करण्याची मोहीम हाती घेतली. आज दुपारपर्यंत बीड शहरात ७५ सडकफिर्‍यांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये १० जण बाधीत आढळून आले आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याने आरोग्य विभाग विविध प्रयत्न करत आहे. रस्त्यावर मोकाट फिरणार्‍यांना प्रशासन घरात बसण्याच्या सूचना वेळोवेळी देत असतानाही ते घरात बसत नसल्याने आता बाहेर फिरणार्‍यांच्याअँटीजेन टेस्ट करण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात सडकफिरे पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. बीड शहरात आठ ठिकाणी सडकफिर्‍यांच्या अँटीजेन टेस्ट केल्या जात आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत ७५ लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये दहा जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!