Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्र‘हे महाराष्ट्राचे दुश्मन ५ नव्हे २५ वर्षे घरी बसवणार’

‘हे महाराष्ट्राचे दुश्मन ५ नव्हे २५ वर्षे घरी बसवणार’

मुंबई (रिपोर्टर)- अन्वय नाईक व ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून उलटसुलट आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज जोरदार समाचार घेतला. ’कोण आहे हा माणूस? काय माहीत आहे त्याला? कोणत्या जमिनीचे व्यवहार? २०१४ सालचा हा कायदेशीर व्यवहार आहे. त्याचे कागद हातात घेऊन हा गिधाडासारखा फडफडतोय. मराठी माणसानं केलेला व्यवहार ह्यांच्या डोळ्यात खुपतोय का?,’ असा संताप राऊत यांनी व्यक्त केला आहे.
वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक केल्यापासून भाजप ठाकरे सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. किरीट सोमय्या यांनी नाईक व ठाकरे कुटुंबामध्ये २१ जमीन व्यवहार झाल्याचा गौप्यस्फोट एका पत्रकार परिषदेत केला आहे. ’या दोन कुटुंबांचा नेमका काय संबंध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचं स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली होती. सोमय्यांच्या या आरोपांना राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिलं.’कोणी काय व्यवहार करावा आणि कशासाठी करावा? हे शेठजींच्या पक्षाचे व्यापारी प्रवक्ते सांगू शकत नाहीत. मुळात हे एका व्यक्तीच्या मृत्यूचं प्रकरण आहे. त्यांची पत्नी व कन्या न्यायासाठी आक्रोश करताहेत. त्याबद्दल शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते बोलत नाही. आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना हे कुठलेही फालतू मुद्दे घेऊन पुढं येताहेत. तपासाची दिशा भरकटवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे,’ असं राऊत म्हणाले. ’आमची भूमिका अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय द्यायची आहे. गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत शिक्षा देण्याची आहे. शेठजीच्या पक्षाच्या प्रवक्त्‌यांना गुन्हेगारांना वाचवायचं आहे. त्यासाठी ही फडफड सुरू आहे, पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही. २१ व्यवहार केल्याचा आरोप करताहेत. हा खोटारडेपणाचा कळस आहे. ही त्यांना वॉर्निंग आहे. त्यांनी कितीही फडफड केली तरी हे सरकार पाच वर्षे चालणार,’ असंही राऊत यांनी ठणकावलं.

Most Popular

error: Content is protected !!