Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज दुपारपर्यंत परळीत २८ जणांच्या चाचण्या एकजण निघाला पॉझिटिव्ह

आज दुपारपर्यंत परळीत २८ जणांच्या चाचण्या एकजण निघाला पॉझिटिव्ह


परळी (रिपोर्टर):- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तीन दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. रस्त्याने फिरणार्‍या सडकफिर्‍यांच्या तालुकास्तरावर चाचण्या करण्यात येत आहेत. आज दुपारपर्यंत परळी येथे २८ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात एक जण पॉझिटिव्ह आढळून आला आहे.


गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये सडकफिर्‍यांच्या रस्त्यावरच कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. या चाचण्यांमध्ेय काही सडकफिरे पॉझिटिव्ह येत आहेत. आज परळी शहरात दुपारपर्यंत २८ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून यामध्ये एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या वेळी शहरातील अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली होती. शहर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक खरात यांनी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केलेला होता.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!