Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनालस शेकड्यात, लोक हजारात जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळली

लस शेकड्यात, लोक हजारात जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळली


ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा; कोरोनाचा संसर्ग रोखण्याऐवजी वाढत जाईल, जिल्ह्यात लसीकरण केंद्र वाढवा, प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाच ते दहा गावात लसीकरण केंद्रे सुरू करा

बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून):- एकीकडे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा समुहसंसर्ग वाढत असताना दुसरीकडे कोरोना लसीकरण केंद्रावर होत असलेल्या प्रचंड गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका निर्माण होत आहे. शासकीय पातळीवर लसीकरणाबाबत नियोजन पुर्णत: कोलमडलेले दिसून येत असल्याने बीड जिल्हा रुग्णालयासह चौसाळा, पिंपळनेर, यासह अन्य लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर लस घेण्यासाठी गर्दी उसळल्याचे दिसून आले. आरोग्य कर्मचारी आणि लोकात काही ठिकाणी शाब्दीक वाद झाल्याचेही सांगण्यात येते. लसीकरण केंद्रावरील गर्दी रोखण्यासाठी आरोग्य प्रशासनाने लसीकरण केंद्र वाढवावेत, अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे.
बीड जिल्ह्यात प्रत्येक उपकेंद्र आणि आरोग्य केंद्र या ठिकाणी सध्या लसीकरण सुरू आहे. बीड जिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्रावर काल झालेला लाठीहल्ला आणि आज पुन्हा त्याच ठिकाणी दिसून आलेली गर्दी ही जिल्ह्यातल्या प्रत्येक लसीकरण केंद्रावर पहावयास मिळत आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी उसळू नये याबाबत आरोग्य विभागाने कुठलेही नियोजन केले नसल्याचे दिसून येते. एकीकडे कोरोनाचा समुहसंसर्ग बीड जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे लसीकरणकेंद्रांवर सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा समुहसंसर्ग येथून वाढण्याची दाट शक्यता आहे. लसीकरण केंद्रांवरील गर्दी रोखण्यासाठी आरोग्य विभागाने लसीकरण केंद्र वाढवण्याची नितांत गरज आहे. प्राथमिक आणि उपकेंद्रांवर आज लस उपलब्ध आहे मात्र त्याठिकाणची गर्दी पाहिल्यानंतर एका प्राथमिक आरोग्य केंद्रातर्ंगत किमान पाच ते दहा गावांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करावेत जेणेकरून एकाच केंद्रावर हजार-दोन हजार लोकांची उपस्थिती एकाच वेळी दिसून येणार नाही. आज जिल्ह्यातील बहुतांशी केंद्रांवर उसळलेली गर्दी ही सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवणारी आणि बीड आरोग्य विभागाच्या नियोजनाचे लक्तरे वेशीला टांगलेली दिसून आली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!