Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाआजचा पॉझिटिव्हचा आकडा 1437

आजचा पॉझिटिव्हचा आकडा 1437

बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या हजारापेक्षा कमी होत नसल्याने प्रशासनावर प्रचंड प्रमाणात ताण पडू लागला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून कडक लॉकडाऊन करण्यात आले असले तरी रूणांची संख्या कमी झाली नाही. आज आलेल्या अहवालात 1437 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एकुण 4454 संशयितांचे स्वॅब तपासण्यात आले होते. त्यात 3017 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. बीड जिलह्यातही दररोज दीड हजाराजवळ नविन रूग्ण निघू लागले. वाढत असलेल्या रूग्णांची संख्या पाहता याचा आरोग्य प्रशासनावर मोठा ताण पडू लागला. आज आलेल्या अहवालात 1437 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. 4454 जणांचे स्वॅब तपासण्यात आले होते. 3017 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. अंबाजोगाईमध्ये 242, आष्टी 84, बीड 345, धारूर 85, गेवराई 107, केज 195, माजलगाव 58, परळी 58, पाटोदा 126, शिरूर 90, वडवणीत 47 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!