माजलगाव (रिपोर्टर) पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात उभ्या करण्यात आलेल्या घंटा गाड्यांना आज दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीमध्ये गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. आगीचे कारण समजू शकले नसून आग अज्ञात व्यक्तीने लावली असावी, अशी चर्चा होत आहे.
माजलगाव नगरपालिकेने आपल्या घंटा गाड्या पंचायत समितीच्या आवारात उभ्या केल्या होत्या. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या घंटा गाड्यांना आग लागली. या आगीत नऊ गाड्यांपैकी दोन गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदरील हा प्रकार काही लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाने घटनास्थळी येऊन आग विझवली. आगीचे कारण समोर आले नसले तरी ही आग कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लावली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.