नेकनूर/बीड (रिपोर्टर) नेकनूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गाड्यातले डिझेल चोरीला जात आहे. रात्री मोरगाव शिवारातून डिझेल चोरीला जात होते. कुत्र्याच्या भुंकण्याने नागरिक जागृत झाले त्यामुळे चोरटे पळून गेले. सकाळी नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
मोरगाव शिवारातील राणुबाई वस्तीवरील तुळशीराम काटकर यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या गोरे इंग्लिश स्कूलच्या गाड्यातून रात्री चोरटे डिझेल काढत होते. चोरट्यांना पाहून कुत्रे भुंकू लागले. त्यामुळे आजुबाजुचे लोक जागे झाले. लोक जागे होताच चोरट्यांनी पळ काढला. एका चोरट्याची घटनास्थळी चप्पल आढळून आली. आज सकाळी नेकनूर पोलीस ठाण्याचे विलास हजारे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नेकनूर परिसरात गाड्यातून डिझेल चोरीला जात आहेत.