Thursday, December 3, 2020
No menu items!
Home क्राईम नदीत करंट सोडून मासे पकडताना चुलत्या-पुतण्याचा शॉक लागून मृत्यू

नदीत करंट सोडून मासे पकडताना चुलत्या-पुतण्याचा शॉक लागून मृत्यू

धारूर तालुक्यातील काळ्याचीवाडी येथे घडली घटना
धारूर (रिपोर्टर)- मासे पकडण्यासाठी धारूर तालुक्यातील काळ्याचीवाडी येथे काल चुलत्या-पुतण्यांनी नदीत करंट सोडला होता. त्यानंतर ते मासे पकडण्यासाठी पाण्यात उतरले असता त्यांना शॉक लागल्याने यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
यावर्षी चांगला पाऊस पडल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत. धारूर तालुक्यातील काळ्याचीवाडी येथे नदीला पाणी असल्याने मोठ्या प्रमाणात मासे आहेत. हे मासे पकडण्यासाठी सहदेव रुपनर (वय २३) व दीपक मारुती रुपनर (वय २२) या युवकांनी करंट सोडला होता. त्यानंतर ते मासे पकडण्यासाठी पाण्यात उतरले मात्र विद्युत प्रवाह सुरुच राहिल्याने त्यांना शॉक बसला. त्यात दोघांचा मृत्यू झाला. काल दोघेही मासे पकडण्यासाठी गेले होते. ते घरी परत न आल्याने कुटुंबियाने त्यांचा शोध घेतला असता त्यांचे मृतदेह पाण्यात आढळून आले. ऐन सणासुदीच्या तोंडावर ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी धारूर पोलिसांनी भेट देऊन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.

Most Popular

बिबट्या बीडच्या सीमेवर, चर्‍हाट्याजवळ महिलेवर हल्ला

बीड (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आले नसतानाच बीडच्या सीमेलगत चर्‍हाट्याजवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची...

माजी मंत्री पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

बीड (रिपोर्टर)- मला सर्दी खोकला आणि ताप असल्याने मी जबाबदारी स्वीकारून स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे, अशी माहिती भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी...

गावागावात नरभक्षी सन्नाटा अफवामुळे संभ्रम

किन्ही गावातील काही रहिवाशांचे पलायन, लहान मुलांनी स्वत:ला कोंडून घेतले; सायंकाळी पाच नंतर घराची दारे बंद करून घेतात ग्रामस्थसंपुर्ण रात्र जीव मुठीत...

पिंपळनेर येथील जेष्ठ स्वतंत्र सैनिक किसनराव नरवडे पाटील यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार

  पिंपळनेर - रिपोर्टर . बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील जेष्ठ स्वतंत्र सैनिक किसनराव नरवाडे पाटील यांचे...