Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडआ.मेटे जिल्हाधिकार्‍यांना भेटले, मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले

आ.मेटे जिल्हाधिकार्‍यांना भेटले, मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले


म्हणाले, आधी मराठ्यांना आरक्षण सवलत द्या नंतर पंतप्रधान, राष्ट्रपतींकडे बोट दाखवा
बीड (रिपोर्टर):- मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे मराठा समाजावर आकाश कोसळला आहे. समाजाच्या मुलामुलींचे शैक्षणिक व प्रशासकीय भविष्य अंधारमय झाले आहे. हे सर्व आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाले असून केंद्र सरकारकडे बोट दाखवून वेळकाढूपणा करण्यापेक्षा मुख्यमंत्री म्हणून ठाकरे सरकार मराठा समाजाला काय आणि कसा न्याय देणार, आरक्षण कसे देणार, सोयी-सवलती कशा देणार हे अगोदर सांगावे. मराठा समाजाला वेळीच न्याय देत आमच्या मागण्यांचा विचार करावा नसता आम्हाला संघर्षाशिवाय पर्याय नाही, असा इशारा देणारे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे आ. विनायक मेटे यांनी आज सकाळी जिल्हाधिकार्‍यांना दिले.
लॉकडाऊन संपल्यानंतर मोर्चाचा इशारा देणारे शिवसंग्रामचे सर्वेसर्वा आ. विनाक मेटे यांनी आज जिल्हाधिकारीर रविंद्र जगताप यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. या निवेदनात आ.मेटेंनी राज्य सरकारच्या दुर्लक्षपणामुळे आणि नाकर्तेपणामुळेच मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारने योग्य बाजू मांडली नाही, मराठा समाजाच्या आरक्षणाला गांभीर्याने घेतलं नाही, सतत दुर्लक्ष केले. यामुळेच आरक्षण मिळाले नाही, असे म्हणत मराठा समाजावर आघाडी सरकारने अन्याय केल्याचे म्हटले. त्यांच्या विरोधात मराठा समाज जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, न्याय मिळत नाही तोपयर्ंत आंदोलन व संघर्ष करणार आहे. तसा निर्णय समाजाने घेतला आहे. म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान ,राष्ट्रपती यांच्याकडे बोट दाखवून वेळकाढूपणा करण्याऐवजी आपण स्वत:च्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मराठा समाजाला काय आणि कसा न्याय देणार, आरक्षण कसे देणार, सोयी-सवलती कशा देणार हे अगोदर सांगा, त्यानंतर मग काय तो पत्र प्रपंच करा, त्याचबरोबर अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजावर ही वेळ आली आहे म्हणून त्यांची त्वरीत हकालपटटी करा, अशा आशयाची मागणी करत आ. मेटेंनी मागण्यांचा विचार केला गेला नाही तर संघर्षाशिवाय पर्याय नाही, असा इशारा निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना दिला. या वेळी मेटेंसोबत सुधीर काकडे, अनिल घुमरे, सुहास पाटील, अशोक सुखवसे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!