Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeकोरोनागेवराई पोलिसांच्या कारवाईचा धडाका सुरूच ; आज सकाळपासून ७२ कारवाया करत १६...

गेवराई पोलिसांच्या कारवाईचा धडाका सुरूच ; आज सकाळपासून ७२ कारवाया करत १६ हजार रु. दंड वसुली


गेवराई (रिपोर्टर) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आले असून विनाकारण बाहेर फिरणार्‍या सडकफिर्‍यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने लाठ्यांचा प्रसाद देत दंडात्मक कारवाई करण्यात येत असून आज सकाळपासून एकूण ७२ जणांवर कारवाई करत १६ हजार ३०० रुपयाची दंड वसुली करण्यात आली आहे.
दरम्यान कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनची पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार यांच्या नेतृत्वाखाली गेवराई पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक अंमलबजावणी करण्यात येत असून रोज विविध ठिकाणी कारवाया करत दंड वसुली करण्यात येत आहे. यामध्ये आज सकाळपासून गेवराई शहरातील शिवाजी चौक ३७ जणांवर कारवाई करत एकूण ७ हजार ७०० रुपये तर खामगाव चेक पोस्ट या ठिकाणी २३ जणांवर कारवाई करून ६ हजार ६०० रु तर नगर परिषदेच्या वतीने विना मास्क फिरणार्‍या १२ जणांवर कारवाई करत २ हजार रु. दंड वसुली करण्यात आली. आज सकाळपासून सर्व मिळून ७२ कारवाया करत एकूण ३७ हजार रुपयाची दंड वसुली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार, सपोनि प्रफुल्ल साबळे, संदीप काळे, पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ, मनीषा जोगदंड, अर्चना भोसले, पो.ना.शरद बहिरवाळ, नारायण खटाने, गणेश नागरे, हनुमान जावळे, अमोल खटाने, परमेश्वर तागड, एकनाथ कावळे, नप चे येवले, निकम, यांच्यासह जि.प.शिक्षक आदींनी या कारवाया केल्या असून या कारवाईने मोकाट फिरणारांना चाप बसत असून रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!