Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeक्राईमगेवराईत वाळू माफियांवर कारवाई नऊ ट्रॅक्टर घेतले ताब्यात

गेवराईत वाळू माफियांवर कारवाई नऊ ट्रॅक्टर घेतले ताब्यात


गेवराई (रिपोर्टर):-गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक होत आहे. आज सकाळी सावरगाव येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती गेवराई पोलीसांना मिळाल्यानंतर त्या ठिकाणी गेवराई पोलिस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार यांनी छापा टाकून ९ ट्रॅक्टर ताब्यात घेतले. याच ठिकाणी अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती एसपींच्या पथकालाही मिळाल्यानंतर एसपींचे पथकही त्या ठिकाणी आले होते.
गेवराई पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार यांनी अवैध धंद्याला थारा देणार नसल्याचे गेल्या दोन-तीन दिवसातच दाखवून दिले आहे. आज सकाळी सावरगाव येथील गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच पेरगुलवार यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ, शरद दहिवाळ यांनी सावरगाव येथील गोदावरी नदी पात्रात छापा मारून नऊ ट्रॅक्टर ताब्यात घेतले. त्यांच्या या धडक कारवाईमुळे वाळूमाफीयांचे धाबे दणाणले आहेत. त्याच ठिकाणी अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती एसपीच्या पथकाला मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पथकही आले होते. गेवराई पोलीस आणि पथकाने ही संयुक्त कारवाई केली असल्याचे समजते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!