Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeकोरोनाबीड जिल्ह्याला काही कमी पडू देणार नाही -एकनाथ शिंदे कुंडलिक खांडेंनी उभारलेल्या...

बीड जिल्ह्याला काही कमी पडू देणार नाही -एकनाथ शिंदे कुंडलिक खांडेंनी उभारलेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटरचे उद्घाटन

बीड (रिपोर्टर):- कोरोनाच्या संकट काळामध्ये बीड जिल्ह्याला काहीही कमी पडू देणार नसल्याचे सांगत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अंथरवण पिंप्री येथे उभारण्यात आलेले स्व. बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटरचे उद्घाटन केले. शिवसेनाप्रमुखांनी आम्हा शिवसैनिकांना संकटाच्या काळात लोकांच्या मदतीला धावून जाण्याची शिकवण दिली आहे. त्या शिकवणीतून शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक कोरोनाच्या संकटात काम करत आहे. आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दोनशे खाटांचे हे जे कोविड सेंडर उभारले आहे या सेंटरमधून आलेला प्रत्येक रुग्ण बरा होऊन घरी जाईल, असा विश्‍वास व्यक्त करत बीड जिल्ह्याला ऑक्सिजनसह अन्य कुठल्याही गोष्टी कमी पडू देणार नाही, असा विश्‍वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. ते अंथरवणपिंप्री येथे आयोजीत स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या वेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, माजी खा. चंद्रकांत खैरे, कुंडलिक खांडे, बाळासाहेब पिंगळे, बाळासाहेब अंबुरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
बीडपासून जवळच असलेल्या अंथरवणपिंप्री येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दोनशे खाटांचे कोविड सेंटर उभारले आहे. या कोविड सेंटरचे उद्घाटन आज राज्याचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना शिंदे म्हणाले की, राज्यावर कोरोनाचं महाभयंकर संकट आलं आहे. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नांची परिकाष्ठा करत आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी प्रचंड गांभीर्याने आजची परिस्थिती हाताळली आहे. कोविड लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर आता काही जिल्ह्यात रुग्णांचा आकडा कमी होत आहे. बीड जिल्ह्यातही शासन-प्रशासन चांगले काम करत आहे. शिवसेनाप्रमुखांनी आम्हा शिवसैनिकांना संकटाच्या वेळी सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावन जाण्याची शिकवण दिली. त्या शिकवणीतून शिवसैनिक ठिकठिकाणी कोरोना काळात काम करत आहे. इथेही कुंडलिक खांडे यांनी कोविड सेंटर उभारून बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक असल्याचे दाखवून दिले आहे. बीड जिल्ह्यात ऑक्सिजन अथवा अन्य कुठल्याही गोष्टींची कमतरता कमी पडू देणार नाही, असे ना. एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Most Popular

error: Content is protected !!