बीड (रिपोर्टर) एलआयसीमध्ये गोरगरीब जनतेचे पैसे आहेत. केंद्र सरकारने एलआयसीचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न चालवला असून सदरील हा प्रकार करू नये, या व इतर मागणीसाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने एलआयसी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झाले.
एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर सरकारी वित्तीय संस्थांमधील अदानी उद्योग समुहात केलेल्या गुंतवणूक संदर्भात चर्चा व्हावी व गुंतवणूकदारांच्या पैशांना संरक्षण मिळावे, एलआ-यसीकडील गोरगरीबांचा पैसा अदानी सारख्या बुडव्या उद्योगपतींना देऊन एलआयसीचे खासगीकरण करण्यात येऊ नये यासह इतर मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज एलआयसी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या वेळी अॅड. श्रीनिवास बेदरे, गणेश बजगुडे, परवेज कुरेशी, नवनाथ थोटे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.