Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज आले 1314 पॉझिटिव्ह बीड शहरासह ग्रामीण भागात 419 रूग्ण सापडले

आज आले 1314 पॉझिटिव्ह बीड शहरासह ग्रामीण भागात 419 रूग्ण सापडले


बीड (रिपोर्टर)ः- कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडकडीत निर्बंध लावण्यात आले असले तरी कोरोनाची साखळी अद्यापही तुटत नसल्याचे दिसून येवू लागले. आज आलेल्या अहवालाच 1314 जण पॉझिटिव्ह आले. 4 हजार 112 जणांची तपासणी करण्यात आली होती. 2 हजार 798 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्णांचा संसर्ग वाढतच आहे. शहरी भागानंतर ग्रामीण भागात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येवू लागले. आज आलेल्या अहवालात 1314 जण पॉझिटिव्ह आले. एकूण 4 हजार 112 जणांची तपासणी करण्यात आली हेती. त्यामध्ये 2798 निगेटीव्ह आले आहेत. अंबाजोगाईत 242, आष्टी 42, बीड 419, धारूर 91, गेवराई 54, केज 100, माजलगाव 76, परळी 123, पाटोदा 66, शिरूर 67, वडवणीमध्ये 54 रूग्ण पॉझटिव्ह आले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!