Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाकडक लॉकडाऊनचा नवा आदेश ,काय चालू काय बंद वाचा

कडक लॉकडाऊनचा नवा आदेश ,काय चालू काय बंद वाचा

बीड –ऑनलाईन रिपोर्टर
बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बुधवारपासून शुक्रवारपर्यंत लागू केलेला कडक लॉक डाऊन आता पुन्हा आणखी काही दिवसांसाठी वाढवला असून बुधवार पर्यंत म्हणजेच 12 मे पर्यंत कायम राहणार असून या काळात मेडिकल वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत त्यामुळे पुढील पाच दिवस देखील जिल्ह्यात कडक लॉक डाऊन असणार आहे हे नागरिकांनी लक्षात घ्यावे

1

बीड जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने काही पावले उचलण्याचा निर्णय घेतला त्यानुसार मेडिकल वगळता इतर सर्व स्थापना यामध्ये किराणा भाजीपाला फळे यांच्या विक्री करण्यास बुधवार गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस बंदी घालण्यात आली होती रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना दंड करून त्यांचे अँटिजेंन टेस्ट देखील केली जात होती

2

दरम्यान शनिवार आणि रविवारी सर्व आस्थापना म्हणजेच सुरू राहतील असे म्हटले होते मात्र शुक्रवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी यांनी नवे आदेश काढत पुढील पाच दिवस म्हणजेच शनिवार ते बुधवार पर्यंत मेडिकल वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे पुढील पाच दिवस देखील बीड जिल्ह्यात कडक लॉक डाऊन असणार आहे नागरिकांनी या काळात बाहेर पडण्याचा प्रयत्न करु नये अन्यथा त्यांना शिक्षेस पात्र धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी जगताप यांनी दिला आहे

3

Most Popular

error: Content is protected !!