Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडमोफत वीज योजना अशक्य -ऊर्जामंत्री

मोफत वीज योजना अशक्य -ऊर्जामंत्री

मुंबई (रिपोर्टर)- करोना व टाळेबंदीचा मोठा फटका महावितरण वीज कंपनीला मिळणार्‍या महसुलाला बसला आहे. राज्य सरकारचीही आर्थिक परिस्थिती ढेपाळलेली आहे. अशा परिस्थितीत गरिबांना १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची योजना प्रत्यक्षात येणे अशक्य आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.
करोनाच्या काळात जादा वीज देयकांची आकरणी झाल्याच्या तक्रारी आहेत, त्याबाबतही काही दिलासा देण्याचा विचार होता, परंतु आर्थिक गणित जमत नसल्याने सध्या तरी मोफत वीज किं वा सवलत काहीच देता येणार नाही, अशी कबुली त्यांनी दिली. करोना साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे उद्योग-व्यवसाय बंद पडल्याने, महावितरण वीज कं पनीला त्याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. महावितरणची बिघडलेली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी केंद्र सरकारकडे कर्जाची मागणी करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारकडून काहीही मदत मिळालेली नाही, असे त्यांनी सांगितले. राज्यातील सत्ताबदलानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये ऊर्जामंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. नितीन राऊत यांनी गरिबांना १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची योजना अमलात आणण्याची घोषणा केली होती. त्यासाठी साधारणत: पावणे दोन कोटी ग्राहकांना या योजनेचा लाभ देण्याची महत्त्वाकांक्षी योजना तयार करण्यात आली होती. मात्र, करोना व टाळेबंदीमुळे महावितरणला मोठी आर्थिक हानी सोसावी लागली, त्यामुळे काही काळ ही प्रस्तावित योजना लांबणीवर टाकण्याचे ठरविण्यात आले होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!