सकाळी शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांची घेतली बैठक
बीड (रिपोर्टर) नरेंद्र पाटील हे बीड जिल्ह्याच्या दौर्यावर आले असून त्यांनी सकाळी शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासविकास महामंडळाचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यासह आदी अधिकार्यांची उपस्थिती होती.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संदर्भात नरेंद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली. बीड जिल्ह्यामध्ये महामंडळातंर्गत किती बेरोजगारांना किती कर्ज उपलब्ध करून देण्यात आले? किती प्रकरणे पेंडिंग आहेत यासह अन्य विषयांच्या संदर्भात त्यांनी अधिकार्यांशी चर्चा केली. प्रथम त्यांनी दहा वाजता शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधून महामंडळाच्या संदर्भात चर्चा केली.