Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeक्राईममेडिकल, किराणा दुकान फोडणार्‍या अट्टल चोरट्याच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या

मेडिकल, किराणा दुकान फोडणार्‍या अट्टल चोरट्याच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या


बीड (रिपोर्टर):- रात्रीच्या वेळी किराणा दुकान, मेडिकल फोडणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली होती. अंबाजोगाई, धारूरसह आदी ठिकाणचे मेडिकल आणि किराणा दुकाना या टोळीने फोडल्या होत्या. या प्रकरणातील एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने काल जेरबंद केले असून त्याचे अन्य तिन साथीदार अद्याप फरार आहेत.
वडवणी येथील मेडिकल दुकान फोडल्याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात २३ एप्रिल २०२१ रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांना मेडिकल दुकान फोडणारा आरोपी वडवणी येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी एक पथक आरोपीच्या मागावर पाठविले. त्यावेळी अंबाजोगाई बसस्थानक परिसरातून आरोपी मंजितसिंग आझादसिंग आंद्रले बावरे रा. प्रसादनगर पाथरी ता. पाथरी जि.परभणी याला पोलीसांनी ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने दि. २१ एप्रिल २०२१ रोजी वडवणी येथील मेडिकल दुकान फोडून चोरी केली असून त्यावेळी त्याच्या सोबत वीरसिंग शेरसिंग गोके (रा. अंबाजोगाई), मोहनसिंग मोब्बतसिंग टाक (रा. वडवणी), अनमोल सिंग कैलास सिंग टाक (रा. धारूर), माखनसिंग शेरसिंग टाक (रा. वडवणी) यांनी वडवणी येथील मेडिकल दुकान फोडल्याचे सांगितले व त्याला त्यामध्ये पाच हजार रुपये हिस्सा आल्याचेही सांगितले. दुसरी चोरीची घटना धारूर येथील असून शहरातील एक किराणा दुकान ३० एप्रिल २०२१ रोजी फोडले. त्यावेळी त्याला दोन हजार रुपये हिस्स्याला आले. २५ एप्रिल रोजी अंबाजोगाई येथील भगवानबाबा चौक येथील मेडिकल दुकान फोडले होते. त्यावेळेस त्याच्या हिश्श्याला दोन हजार रुपये आले, पोलीसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून काही रक्कम मिळून आली. तसेच धारूर येथून चोरलेली मोटारसायकल चोरली होती. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एएस उबाळे, पोलीस हवालदार जगताप, खेडकर, गाययकवाड, शिंदे, हरके यांनी केली.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!