Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeकोरोनाग्रामीण भागात लस केव्हा येते याचे अपडेट द्या

ग्रामीण भागात लस केव्हा येते याचे अपडेट द्या


बीड (रिपोर्टर):- कोरोनाच्या दहशतीने जिल्हाभरातला नागरिक लस घेण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळे लसीकरण केंद्रावर रोज गर्दी होताना दिसून येते. लसीकरणाबाबत सूसुत्रता आणि नियोजन नसल्यामुळे ग्रामीण भागात कधी लस येते आणि कधी संपते हे तेथील लोकांना माहित होत नाही. त्यामुळे प्रशासनाविरोधात रोष निर्माण होत असून ग्रामीण भागातल्या लसीकरण केंद्रांवर केव्हा लस येणार, कुठल्या केंद्रावर किती लस येणार याबाबतची माहिती आरोग्य विभागाने माध्यमांमार्फत रोजच्या रोज लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केले तर लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही.
कोरोनाचा समुहसंसर्ग आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही. अशा स्थितीत कोरोनाची लस हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे लोकांच्या लक्षात आल्यानंतर आता जिल्ह्यातील नागरिक लस घेण्यासाठी धावपळ करताना दिसून येत आहेत. रात्री पासून लसीकरण केंद्रावर रांगा लावत आहेत. परंतु ग्रामीण भागातल्या केंद्रांवर कधी आणि किती लस येणार याची माहिती लोकांना नसते. त्यामुळे अनेक वेळा केंद्रावरील कर्मचारी आणि नागरिकात वाद निर्माण होताना दिसून आले आहे. ग्रामीण भागातील अनेक लसीकरण केंद्रावर केव्हा लस येते याची माहिती लोकांना नसते. परंतु संबंधित केंद्रावरील कर्मचारी जेव्हा याची माहिती आपल्या जवळच्या लोकांना देतात तेव्हा शहरी भागातील लोक ग्रामीण भागात जावून लस घेतात. हेही अनेक वेळा दिसून आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना लस मिळत नाही. यासाठी आरोग्य विभागाने ग्रामीण भागात केव्हा आणि किती लस येणार याची अपडेट रोजच्या रोज माध्यमाच्या मार्फत, सोशल मिडियाच्या मार्फत प्रसारीत केली तर लोकांना आणि प्रशासनाला याची मदत होईल.

Most Popular

error: Content is protected !!