Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोरोनाने मरण पावलेल्या एकाही शिक्षकाच्या कुटुंबियाला अद्याप विमा मिळाला नाही

कोरोनाने मरण पावलेल्या एकाही शिक्षकाच्या कुटुंबियाला अद्याप विमा मिळाला नाही


राज्यात २१२ शिक्षकांचा झाला मृत्यू, बीड जिल्ह्यातील एका शिक्षकाचा समावेश
बीड (रिपोर्टर):- गेल्या एक वर्षापासून कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. कोरोनामुळे शाळा पुर्णत: बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. शाळा बंद असल्यामुळे शिक्षकांवर वेगवेगळ्या कामांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. कोरोनाच्या कार्यकाळात मरण पावलेल्या शिक्षकांच्या कुटुंबियांना ५० लाखांचा विमा देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र या घोषणेची अद्यापपर्यंत अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. आतापर्यंत राज्यात २१२ शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात बीड जिल्ह्यातील एका शिक्षकाचा समावेश आहे.
गेल्या मार्च महिन्यापासून देशामध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्राथमिक शाळा आजपर्यंत बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. शाळा बंद असल्याने शिक्षकांवर वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात आली होती. कोरोनाच्या काळात शिक्षकांनी किराणा साहित्य वाटपापासून ते सर्वे करण्यापर्यंत अनेक कामे केलेली आहेत. कोरोनाच्या कार्यकाळात मरण पावलेल्या शिक्षकांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचा विमा घोषीत करण्यात आलेला होता. मात्र ही घोषणा अद्यापपर्यंत पूर्ण करण्यात आलेली नाही. आतापर्यंत २१२ शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यु झालेला आहे. या सर्व शिक्षकांच्या कुटंबियांना विम्याचं कवच मिळालेलं नाही. बीड जिल्ह्यातील एक शिक्षक कोरोनामुळे मरण पावलेला आहे. मयताच्या कुटुंबियांना नेमका कधी विमा मिळणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!