Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeबीडसिरसाळ्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ उन्हाळी पिकासह विटभट्टी चालकांचे झाले नुकसान

सिरसाळ्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ उन्हाळी पिकासह विटभट्टी चालकांचे झाले नुकसान


सिरसाळा (रिपोर्टर):- गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यात विविध ठिकठिकाणी वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने उन्हाळी पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. रात्री झालेल्या पावसामुळे धारूर तालुक्यात अक्षरश: झाडे उन्मळून पडली आहेत. आज सकाळी पावणे बारा वाजता सिरसाळा येथे पाऊस पडल्याने यात फळ पिकांसह विटभट्टी चालकांचे नुकसान झाले.
रात्री धारूर परिसरामध्ये वादळी वार्‍यासह पाऊस झाला. या वादळाचा जबरदस्त फटका उन्हाळी पिकांना बसला. हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. आंब्यासह इतर फळपिकांचे नुकसान झाले. आज सकाळी परळी तालुक्यातील सिरसाळा येथे पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील भाजीपाल्यासह पिकांचे व विटभटटी चालकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात कुठे ना कुठे पाऊस पडत आहे. दरम्यान अवकाळी पावसाचा फटका शेती पिकांना बसत असून तीन दिवसात शेती पिकाचंचे मोठे नुकसान झाले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!