Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडबीडमध्ये फुलांना चांगला भाव

बीडमध्ये फुलांना चांगला भाव

बीड (रिपोर्टर)- दरवर्षी झेंडुच्या फुलांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांत निरुत्साह असतो. यंदा मात्र फुलांना चांगला भाव मिळाला. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ७५ ते १०० रुपये दराने फुले विकली जात होती. मध्यंतरी परतीचा पाऊस पडल्यामुळे झेंडुच्या फुलांचे नुकसान झाल्यामुळे उत्पादनात घट झाली.
लक्ष्मी पुजनासाठी झेंडू, गलांडा इत्यादी फुले लागत असतात. यावर्षी या फुलांना चांगला भाव आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, साठे चौक यासह इतर ठिकाणी फुलांचा बाजार भरला होता. दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान पंच्याहत्तर ते शंभर रुपये दराने फुलांची विक्री होत होती. दरवर्षी फुलांना तितका भाव मिळत नसतो यंदा मात्र बरा भाव मिळाल्याने शेतकर्‍यात समाधान व्यक्त केले जात आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!