Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्ह्यात प्रत्येक दीड तासाला एकाचा मृत्यू गेल्या आठ दिवसात जिल्ह्यात १३९ बाधितांचा...

जिल्ह्यात प्रत्येक दीड तासाला एकाचा मृत्यू गेल्या आठ दिवसात जिल्ह्यात १३९ बाधितांचा मृत्यू


बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात कोरोनाच्या समुहसंसर्गाबरोबर गंभीर रुग्णात प्रचंड वाढ होत असून रुग्णालयातील अनागोंदी कारभारामुळे रुग्ण मृत्यूच्या दारात जात असल्याचा आरोप सातत्याने रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. गेल्या आठ दिवसात बीड जिल्ह्यात तब्बल १३९ बाधितांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाकडून आलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. १ मे रोजी जिल्ह्यात ९४२ बाधितांचा मृत्यू आकडा होता तो काल ८ मे रोजी १ हजार ८१ वर जावून पोहचला आहे. त्यामुळे केवळ आठ दिवसता १३९ जणांचा मृत्यू झाल्याचे दिसून येते. म्हणजेच बीड जिल्ह्यात रोज सरासरी १७ जणांचा म्हणण्यापेक्षा प्रत्येक दीड तासाला एका व्यक्तीचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे.

Most Popular

error: Content is protected !!