Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeकोरोनामंगल कार्यालयाच्या व्यवस्थापकाने चावी न दिल्याने लसीकरणासाठी आलेले नागरिक ताटकळले

मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापकाने चावी न दिल्याने लसीकरणासाठी आलेले नागरिक ताटकळले


धारुर शहरातील संतापजनक प्रकार, तहसीलदारांनी दाखवली तत्परता
किल्ले धारूर (रिपोर्टर) शहरातील नगरेश्वर मंगल कार्यालयामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून लसीकरण सुरू आहे परंतु आज सकाळी नगरेश्वर मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापकांनी चावी न दिल्याने तब्बल एक तास लसीकरणासाठी आलेल्या महिला वृद्ध नागरिक यांना ताटकळत बसावे लागले.


धारुर शहरातील नगरेश्वर मंगल कार्यालय हे शहरात मध्यवर्ती ठिकाण असल्याने या कार्यालयात आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या काही दिवसापासून लसीकरण मोहीम सुरू आहे परंतु आज सकाळी लस घेण्यासाठी महिला वृद्ध नागरिक व इतर तरुण व्यक्ती गेले होते आपला नंबर लवकर यावा यासाठी सकाळी साडेआठ वाजल्यापासूनच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या परंतु येथील व्यवस्थापकाने नागरिक अस्वच्छता करत असल्याने चावी देण्यास नकार दिला त्यामुळे आरोग्य विभागाचे कर्मचारी हतबल झाले
नागरिकांना ही लस शिवाय ताटकळत बसावे लागले बघता बघता गर्दी मोठ्या प्रमाणात झाली परंतु चावी काही मिळत नव्हती येथील काही जागृत पत्रकार यांनी हा प्रकार तहसीलदार वंदना शिडोळकर यांना सांगितलं त्यांनी लागलीच या प्रकाराची गंभीर दखल घेत तत्परता दाखवत मंगल कार्यालयाचे व्यवस्थापकाला समज देऊन सामाजिक कार्यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले त्यानंतर चावी दिल्याने तब्बल एक तास उशिराने लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली वेळीच तालुका आरोग्य प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रशासन यांनी अशा घटना होऊ नयेत यासाठी अगोदरच उपाय योजना करणे गरजेचे आहे कोरोणाचे संकट वाढत असताना गर्दी करणं गर्दी होऊ देणे चुकीच आहे असे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासनाने गंभीर दखल घेऊन काटेकोरपणे नियोजन आगोदरच करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यातून होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!