Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्हाधिकार्‍यांनी बँकेच्या कामकाजात केला बदल सलीम जहॉंगीर यांनी केली होती मागणी

जिल्हाधिकार्‍यांनी बँकेच्या कामकाजात केला बदल सलीम जहॉंगीर यांनी केली होती मागणी


बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हाधिकारी यांनी बँकेच्या वेळेत बदल केला होता. सदरील बँकेच्या कामकाजात बदल करावा, अशी मागणी भाजपा अल्पसंख्याक विभागाचे सलीम जहॉंगीर यांनी केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी सकाळी दहा ते दुपारी २ पर्यंत बँकांना कामकाज करण्यास मुभा दिली आहे.
बँकेचे कामकाज आता सकाळी १० ते दुपारी दोन वाजेपर्यंत (दि. १०.५.२०२१ पर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) केवळ अंतर्गत कामकाज, शासकीय व्यवहार, पेट्रोल पंप व गॅस एजन्सी धारकांचे व्यवहार, कृषी विषयक व्यवहार, वैद्यकीय कारणास्तव केले जाणारे व्यवहार, सर्व शासकीय लाभार्थ्यांच्या वेतनासंदर्भातील व्यवहार, अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणार्‍या आस्थापनांना या वेळेत बँकेत जावून व्यवहार करण्यास मुभा देण्यात आली आहे.

Most Popular

error: Content is protected !!