Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeक्राईमपीआय विश्‍वास पाटलांविरोधात पत्रकारांचे एसपींना निवेदन

पीआय विश्‍वास पाटलांविरोधात पत्रकारांचे एसपींना निवेदन


चौकशी करून कारवाई करण्याचे दिले आश्‍वासन
बीड (रिपोर्टर):- वृत्त संकलन करण्यासाठी पेठ बीड पोलीस ठाण्यात गेलेल्या पत्रकाराला अपमानास्पद वागणूक देत ठाण्यातून बाहेर जा, म्हणणार्‍या पीआय विश्‍वास पाटील यांच्या विरोधात शहरातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. या वेळी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन पत्रकारांना पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी दिले.


काल वृत्तसंकलन करण्यासाठी दैनिक बळीराजाचे संपादक अक्षय रडे हे पेठ बीड पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी ते फोटो काढत असताना पीआय विश्‍वास पाटील यांनी रडे यांना अपमानास्पद वागणूक दिली. यापुर्वी देखील विश्‍वास पाटील यांनी अनेक पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिली आहे. आमच्या विरोधात बातम्या छापता याचा राग धरून त्यांनी वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिली. पोलीस निरीक्षक पाटील हे अवैध धंदेवाल्यांना पत्रकारांच्या विरोधात चिथावणी देण्याचे काम करतात. विश्‍वास पाटील हे जाणीवपुर्वक पत्रकारांना त्रास देतात. त्यानंतर आज सकाळी बीड शहरातील सर्व पत्रकार पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यासाठी गेले होते मात्र एसपींनी पत्रकारांना वेळ न दिल्यामुळे पत्रकार थेट जिल्हाधिकार्‍यांकडे गेले. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना हकीकत सांगितल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी एसपींना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून घेतले. त्याच ठिकाणी पत्रकारांनी एसपींना आपल्या मागणीचे निवेदन दिले. या निवेदनावर पत्रकार व्यंकटेश वैष्णव, संजय मालाणी, भागवत तावरे, अशोक होळकर, सुंदर देशमुख, दत्तात्रय नरनाळे, अक्षय केंडे, चंदन पठाण, उपेंद्र कुलकर्णी, सुरेश जाधव, शुभम खाडे, संजय तिपाले, लक्ष्मीकांत रुईकर, अनिल घोरडकर, गणेश जाधव, ज्ञानोबा वायबसे, नागनाथ जाधव, नितीन चव्हाण, सय्यद इरफान, विनोद जिरे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Most Popular

error: Content is protected !!