Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडधारूरअवकाळीने धारूर तालुक्यातील उन्हाळी पिके उद्ध्वस्त तहसीलदार पंचनामा करण्यासाठी जहागीरमोहात

अवकाळीने धारूर तालुक्यातील उन्हाळी पिके उद्ध्वस्त तहसीलदार पंचनामा करण्यासाठी जहागीरमोहात


धारूर (रिपोर्टर):- अवकाळी वादळी वार्‍यासह पावसाने काल धारूर, वडवणी या तालुक्यात धुमाकूळ घातला. या पावसाने भर उन्हाळ्यात नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाला आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला. तालुक्यात आंब्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून वादळाने आंब्याला जबरदस्त फटका बसला. कित्येक शेतकर्‍यांच्या शेतीत पाणी घुसल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आज तहसीलदार वंदना शिडोळकर, मंडल अधिकारी, तलाठी इत्यादी कर्मचारी जहागीरमोहा येथे पंचनामा करण्यासाठी गेले होते.
गेल्या तीन-चार दिवसांपासून मराठवाड्यात विविध ठिकाणी वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा उन्हाळी पिकांना जबरदस्त फटका बसू लागला. काल धारूर, वडवणी व माजलगाव परिसरात चांगलाच पाऊस झाला. यामध्ये वडवणी आणि धारूर तालुक्यातील नद्या-नाल्यांना अक्षरश: पुर आला होता. वादळाचा आंब्यासह इतर फळ पिके, भाजीपाल्याला मोठा फटका बसला. हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिसकावला. सगळ्यात जास्त नुकसान जहागीरमोहा गावात झाले. येथील शेती अक्षरश: उद्ध्वस्त झाली. आज सकाळी तहसीलदार वंदना शिडोळकर, मंडल अधिकारी, तलाठी यांनी जहागीरमोहा येथे जावून उद्ध्वस्त झालेल्या शेतीचे पंचनामे केले. दरम्यान पंचनामा करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार यांच्या समवेत भाजपाचे रमेश आडसकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत द्या -आडसकर
धारूर तालुक्यात काल अवकाळी पावसाने हाहाकार माजला अतिवृष्टी झाल्याने जहागिरमोहा पहाडी पारगाव अशा अनेक गावात शेतकर्‍यांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नद्यांना पूर आले या नदीच्या पाण्यामध्ये जनावरे, वाहने, वाहून गेली अनेक शेतकर्‍यांची गोठे पडले ,वीज पडून बैल दगावले खूप मोठी हानी शेतकर्‍यांची व नागरिकांची झाली आहे. आज जागीरमोहा या ठिकाणी भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे प्रशासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!