Saturday, October 23, 2021
No menu items!
HomeUncategorizedकेज शहरातील आठ दुकानदारांना ठोठावला दंड नगर पंचायत, पोलीस, महसूल विभागाची कारवाई

केज शहरातील आठ दुकानदारांना ठोठावला दंड नगर पंचायत, पोलीस, महसूल विभागाची कारवाई


केज (रिपोर्टर)ः- शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी काही व्यापारी लपून छपून दुकाने उघडतात.अशा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. केज शहरातील आठ दुकानदारांना महसुल, पोलीस आणि नगर पंचायतने दंड ठोठावला. नियमाचा उल्लघंन केल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावलेले आहे. असे असतांना काही जण दुकानं उघडून लपून छपून आपला माल विक्री करतात. केज शहरामध्ये काही दुकानदारांनी नियमाची उल्लघंन केल्याचे समोर आले. आठ दुकानदारांनी नियम तोडल्याने त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदरील या दुकानदारांवर तहसिलदार दुलाजी मेंडके, नायब तहसिलदार सचिन देशपांडे, तलाठी केदार, पोलीस अधिकारी मिसळे, नामदास, मुख्याधिकारी मिलींद सावंत, स्वच्छता निरीक्षक असद खतीब, वट्टे, अनिल राऊत,सय्यद अन्वर, पठाण अय्युब, आजबे, पोटे, काळे, अमर हजारे, सय्यद अतीक, शेख आझाद सह आदिंनी कारवाई केली.

Most Popular

error: Content is protected !!