Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाआजच्या अहवालात 1258 जण पॉझिटिव्ह, काल 1218 जणांना सुट्टी

आजच्या अहवालात 1258 जण पॉझिटिव्ह, काल 1218 जणांना सुट्टी


बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्णांचा आकडा दररोज बाराशेच्या पुढेच निघू लागला. आज आलेल्या अहवालात 1258 जण पॉझिटिव्ह निघाले असून 4482 जणांची चाचणी करण्यात आली होती. 3224 जण निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान ज्या प्रमाणे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या मोठया प्रमाणात निघत आहे. त्याच प्रमाणात दुरूस्त होणार्‍यांचे प्रमाणही मोठे आहे. काल बाराशेपेक्षा जास्त जणांची सुट्टी झाली होती.

कोरोनाच्या साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले. असे असताना कोरोनाचा आकडा कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. आज आलेल्या अहवालात 1258 जण पॉझिटिव्ह आले. 4482 जणांची चाचणी करण्यात आली. त्यात 3224 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 188, आष्टी 140, बीड 310, धारूर 77, गेवराई 75, केज 128, माजलगाव 88, परळी 58, पाटोदा 73, शिरूर 61, आणि वडवणीत 60 जण पॉझिटिव्ह आले आहेत. काल बाराशेपेक्षा जास्त रूग्णांना सुट्टी झाली होती.

Most Popular

error: Content is protected !!