Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeकोरोनाम्हणून भारतात करोनाची इतकी वाईट परिस्थिती! डॉ. फौचींनी सांगितलं कारण!

म्हणून भारतात करोनाची इतकी वाईट परिस्थिती! डॉ. फौचींनी सांगितलं कारण!


दिल्ली :-
दुसर्‍या लाटेचा इतका जोरदार तडाखा भारताला कसा बसला? यावर जगभरात खलबतं सुरू असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांनी भारतात करोनाची इतकी वाईट परिस्थिती उद्भवल्याचं कारण स्पष्ट केलं आहे. करोनाच्या परिस्थितीविषयी भारताचा अंदाज चुकल्याचं फौची यांनी सांगितलं. भारत आज करोनाच्या इतक्या भयंकर परिस्थितीत सापडला याचं कारण म्हणजे भारतानं परिस्थितीचा चुकीचा अंदाज बांधला आणि योग्य वेळेपूर्वीच सर्व व्यवहार सुरू केले, असं फौची म्हणाले आहेत. भारताला वाटलं की करोना आता देशात संपला आहे. त्यामुळे त्यांनी खूप लवकर सर्व गोष्टी सुरू करायला सुरुवात केली. त्यामुळे सध्या भारतात वेगाने फैलावत असलेल्या करोनाचं भीषण रुप आपल्या सगळ्यांना दिसत आहे, असं ते म्हणाले.

Most Popular

error: Content is protected !!