Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज आलेल्या अहवालात 1270 पॉझिटिव्ह

आज आलेल्या अहवालात 1270 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन लावूनही कोरोना पॉझिटिव्हचा आकडा कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. दररोज जवळपास 1200 पेक्षा जास्त नवीन रूग्ण आढळून येवू लागले. आज आलेल्या रिपोर्टमध्ये 1270 पॉझिटिव्ह निघाले. त्यामध्ये 3018 निगेटिव्ह तर 4288 जणांचे स्वॅब तपासण्यासाठी घेण्यात आले होते.
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असली तरी बीड जिल्ह्यातील मात्र आकडा कमी होत नसल्याचे दिसून येवू लागले. दररोज 1200 पेक्षा जास्त नवीन रूग्ण आढळून येवू लागले. आज आलेल्या रिपोर्टमध्ये 1270 पॉझिटिव्ह रूग्ण निघाले. 3018 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर एकूण 4288 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. अंबाजोगाई 174, आष्टी 146, बीड 213, धारूर 68, गेवराई 142, केज 173, माजलगाव 74, परळी 58, पाटोदा 40, शिरूर 141 आणि वडवणी 41 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!