Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडअरं तो शिंदेचा माऊली कोण?

अरं तो शिंदेचा माऊली कोण?


राऊंड झाल्यानंतर रेमडिसीवीर देणारा ऑडिओ क्लिप व्हायरल; काळाबाजार करणार्‍याचा शोध घ्यावा
बीड (रिपोर्टर):- बीड शहरासह जिल्हाभरात रेमडिसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत असतानाच एक ऑडिओ क्लिप सध्या बीडमध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. साहेब राऊंडवर आहेत, कोणाला इंजेक्शन द्यायचं, कोणाला नाही द्यायचं ते ठरवतात. त्यात्यातून एखादं इंजेक्शन शिल्लक राहीलं की, तुम्हाला देतो, काळजी करू नका. माऊली घरू येऊन इंजेक्शन देईल. आम्हालाच आता नऊ हजाराला पडतय, अशा आशयाचं संभाषण असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने बीडमध्ये सर्रास रेमडिसीवीरचा काळाबाजार होतोय.


याबाबत अधिक असे की, बीड शहरासह जिल्ह्यात रेमडिसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी रोज होत आहेत. ज्यादा भावाने रुग्णांना इंजेक्शन घ्यावे लागते. जिल्हा प्रशासनाने रेमडिसीवीर इंजेक्शनबाबत कितीही नियोजन करण्याचा देखावा केला असला तरी ५ ते ६ दिवसांच्या गॅपमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचे आणि या सहा दिवसांच्या कालावधीत बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांचे रेमडिसीवीर अधिकृतपणे काळ्या बाजारात विकले जातात. सध्या एक रेमडिसीवीर इंजेक्शनच्या मागणीदाराचे आणि विक्री करणार्‍याची ऑडिओ क्लिप बीडमध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये शिंदेसाहेब राऊंड घेत आहेत, राऊंड झाला की, कोणाला इंजेक्शन द्यायचं ते ठरवतात. त्यानंतर तुम्हाला इंजेक्शन दिलं जाईल, आम्हाला ते इंजेक्शन आज ९ हजार रुपयांना पडतं, आमचा माणूस तुम्हाला इंजेक्शन देईल, माऊली घरी येऊन तुम्हाला इंजेक्शन प्राप्त करून देईल, अशा आशयाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे त्या शिंदेचा माऊली कोण? याचा शोध जिल्हा प्रशासनाने घ्यावा आणि रेमडिसीवीरचा काळाबाजार करणार्‍यांना अटकाव घालावा, अशी मागणी होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!