Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeकोरोनाधनंजय मुंडेंचा सेवाधर्म : २० हजार मुस्लिम बांधवांना शिरखुर्मा किट वाटप

धनंजय मुंडेंचा सेवाधर्म : २० हजार मुस्लिम बांधवांना शिरखुर्मा किट वाटप


परळी मतदारसंघातील गरीब कुटुंबांची रमजान ईद होणार गोड
परळी (रिपोर्टर):- परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी सर्व काही समाज हितासाठी हे ब्रीद जोपासत सुरू केलेल्या सेवाधर्म उपक्रमांतर्गत ना. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान मार्फत या वर्षीची रमजान ईद गोड करण्यासाठी परळी शहर व मतदारसंघातील विविध गावांमधील २० हजार मुस्लिम कुटुंबियांना मोफत शिरकुरमा किट वाटप करण्यात येत आहेत.

परळी शहर व ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये या किट वाटप करण्यात येत असुन, यामध्ये आटा, साखर, खाद्यतेल, काजू, बदाम, मनुके, खारीक, खोबर्‍याचा किस, गोडाम्बी, चारोळी इत्यादी साहित्याचा समावेश आहे. रमजान ईद निमित्त या किट परळी शहरात तसेच राडी, सायगाव, सुगाव, बरदापुर, लिंबगाव, सातेफळ, धायगुडा पिंपळा, दैठण घाट, सिरसाळा, धर्मापुरी, पोहनेर, पिंपरी बु, मोहा, हातोला, तळेगाव, घाटनांदूर, नागापूर, दादाहरी वडगाव, पोखरी, वाघाळा, मोहा, टोकवाडी, गिरवली, चौथेवाडी, पूस, जवळगाव, धानोरा या गावांमध्ये वाटप करण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांमार्फत सुरू आहे तर आणखी विविध गावांमध्ये वाटप करण्यात येणार आहे.धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठान मार्फत हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. याही वर्षी हजारो कुटुंबांची रमजान ईद गोड करणार्‍या धनंजय मुंडे यांचे गावगावातून आभार मानले जात आहेत.

Most Popular

error: Content is protected !!